◼️ काव्यरंग : अलविदा २०२०”

“अलविदा २०२०”

अचानक आला होता
काळ होऊन दानव,
सावरला पुन्हा तरी
कात टाकून मानव!

केले युद्ध कोरोनाशी
देव मदतीला आले,
माणसाच्या रुपातच
साक्षात्कार जनां झाले!

कुटुंबास दिला वेळ
छंद काही जोपासले,
नाती, मित्र मंडळही
पुन्हा नवे गवसले!

अनुभव, भले घेऊ
घालू वाईट पाठीशी,
याच वर्षात पडली,
पुन्हा गाठ लेखणीशी!

आली दुसरी आवृत्ती
शिस्त नियमीत पाळू,
नमस्कारा, कर जोडू
हात मिळवणी टाळू!

देऊ, निरोप आनंदे
म्हणू, अलविदा वीस,
करु, स्वागत हर्षाने
येऊ पाहे, एकवीस !

◼️.✍️ सौ. प्रिया प्रकाश गावडे, ठाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *