… क्रांतीज्योती…
अंधारलेल्या काळोख रात्री
तूच हाती मशाल घेतली
जळत होती जीवनात स्त्री
ज्ञानाची ज्योत तूच लावली…
दिनदुबळ्याला आपले समजुनी
ममतारूपी माऊली झालीस
दगड धोंड्याचा मार खाऊनी
लढणारी तू दामिनी झालीस…
ज्योतिबाची ज्योत होऊनी
शिक्षणाची जननी झालीस
अज्ञानाच्या काळोखातूनी
सूर्याची तू किरण झालीस…
क्रांतीचा बुलंद आवाज देऊनी
बहुजनांची तू माय झालीस
शिक्षणाची दारे उघडुनी
माणसाला तू माणूस बनवलीस…
शेवटच्या श्वासापर्यंत लढूनी
मैदानातली तू वीरांगना झाली
समतेची तू हाक देऊनी
माय सावित्री क्रांतीज्योत झाली…
कवी:- राज गुरनुले
मु. कोठा पो. गुंजेवाही ता. सिंदेवाही जि चंद्रपूर
मो. नं. 9527873626