◼️ काव्यरंग : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

माय सावित्रीबाई नी
सुरु केली शाळा
सर्वांना लावला
मायेचा लळा

ज्ञान सागरातून
उमलला शब्द मळा
आगळा वाटतो
क ख ग घ चा अक्षर मळा

सत्यधर्म ज्योतीबा चा
माऊलीने फुलविला
सर्व आकाश दीप
प्रकाशाने दिपविला

शिव्या शिंणोटे
लोकांचे खाल्ले
तरी सर्व कन्या
शिकवून सारले

स्त्रीशक्तीची उद्धारक
शिक्षणाचे उघडले दार
कष्ट उपसले एकटीने
पेटविली ज्ञानाची ज्योत पार

मायेची ऊब दिली
तिने लेकरांना
वारसा चालविते मी
वंदन करून सावित्रीबाईंना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *