◼️ काव्यरंग : बळीराजाची व्यथा

बळीराजाची व्यथा

बळीराजा नको होऊ उदास
प्रयत्नाने संपेल दारिद्र्य,
धीर ठेव आणखी उरात
उभ्या संसाराचा तुच आधार.

गरिबीची घाणेरडी सावली केंव्हापर्यंत पाठलाग करणार,

किती पडणार दुष्काळ, तूझ्या कष्टासमोर देवसुद्धा हरणार.

तू आयुष्यात गरिबीची ज्योत पेटवून दारिद्र्याचे चटके सोसते,

काळया मातीत चंदनापरी स्वतःच अंग झिझवते.

माथ्यावरून गळते घाम,घामातून येई उत्तराचा वास,
आतातरी पीक मस्त फुलणार,अशी मनी होई आस.

शेतकरी बापाच्या खांद्यावर परिवाराचा मोठा भार,
स्वतः अडाणी,तरी मुलांना केले साक्षर.

शिक्षण घेतले, नोकरीला लागले, नवे बनवले करिअर,
पायावर उभे होताच व्यस्त कामात, विसरले देखील ज्यांनी खेळवले खांद्यावर.

शिकले पोरं मौजेत मस्त आहे,
गावातला बाप मात्र चिंताग्रस्त आहे.

आधी पोरं,नंतर शेती गेली,
आता उरले गरिबीचा पाणउतारा,
मला करावसे वाटे आत्महत्या,पण माझ्याविना हा संसार अधुरा.

◼️नितेश. शि .खरोले.
शिक्षण.११.(सुरू).गोरेगाव. गोंदिया
8329454924

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *