◼️ काव्यरंग : मागोवा ◼️✍️सिंधू बनसोडे ,इंदापूर ,जि -पुणे

मागोवा

फुलले क्षण माझे….
तना मनात मयूर नाचे
गुलाबी प्रेमाच्या धुंदीत….
स्वप्न पाहिले संसाराचे

आनंदाच्या क्षणांची उधळण
सख्याच्या प्रेमात न्हाले ….
सुखाची बरसात चहू बाजूनी
मन मंदिर मोहित झाले …

हिरव्यागार वसुंधरेप्रमाणे
कळ्यांची फुले उमलली
एकरूप झालेल्या जीवांना
गोंडस दोन मुले झाली ….

दृष्ट लागण्याजोगा संसार
थोरामोठ्याचा आशीर्वाद
लाभला मज लेकरांना ….
आजी आजोबांचा संवाद

काळाची ती झडप आली
घेऊन गेला कुंकूवाचा धनी
आजार तो जीवघेणी ठरला
हृदयातील दुःख दाटले नयनी

एकटीच आता धडपडते आहे
बापाविना पोरकी चिमणीपाखरं…
आठवते मज सख्याचे ते दिवस
कुठं कुठं शोधू मी आधार …

काय होतं नि काय झालं….
आयुष्याचा मागोवा शोधत आहे
सुख दुःखाच्या या प्रसंगात
स्वतःला आजमावते आहे

संचित होते ते झाले….
खेळ कुणा दैवाचा कळला
मागोवा घेत जीवनाचा….
दोन हात करते दुःखाला

◼️सिंधू बनसोडे ,इंदापूर ,जि -पुणे
©सदस्या -मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *