◼️ काव्यरंग : खांदेपालट ◼️✍️मनीषा ब्राम्हणकर अर्जुनी/मोरगाव, गोंदिया

खांदेपालट

घेतला जन्म आलो जगी
आनंद झाला मनोमनी
उदरात जिच्या होतो
ती झाली समाधानी

चालु लागलो बोलू लागलो
जगाचे व्यवहार शिकू लागलो
आई बाबा साठी च का होईना
अस्तित्व मी जपू लागलो

आलं मला तारुण्य
आईनं बघितली सून
तिच्या सोबत पाहायला
गेलो हम ओर तुम

सोहळा झाला लग्नाचा
हिसाब लागला आयुष्याचा
जे केले पित्याने माझ्यासाठी
मी करू लागलो मुलासाठी

जतन केले संस्काराचे
आयुष्य झाले मोलाचे
खांदे पालट ही झाली
पित्याकडून पुत्राचे

खचलेल्या भिंतीच
आधार बनलो मी
हौस मौस केली माझी
त्याच्यासाठी जगलो मी


◼️ मनीषा ब्राम्हणकर
अर्जुनी/मोरगाव, गोंदिया
मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *