◼️ काव्यरंग : प्रतिक्षा ◼️✍️सौ.सविता पाटील ठाकरे सिलवासा,दा.न.ह.

प्रतिक्षा

बसली होती बाकावर
आजूबाजूस गर्दी फार
मन होई कावरं बावरं
मी पाहात होती वाट..

काय करावे सुचेनासे
मज चैन काही पडेना
आता मात्र हद्द झाली
तो काही केल्या येईना..

हातात घेऊन मोबाईल
करत होते नंबर डायल
येणाजाणार्यांच्या नजरा
करत होत्या मला घायल..

संतापाची अग्नी ज्वाला
मलाआतून जाळत होती
मज अबलेची या प्रसंगी
दया कोणास येत नव्हती

वाट पहाणं काय असतं
त्याला ते काय कळणार
निर्ढावलेलंच मन त्याचं
पाय इकडे कधी वळणार..

डोळे माझे थकले तेव्हा
करूणा आली ती देवाला
अचानक तो जवळ येऊन
माझ्यासमोर उभा राहीला

ज्याच्यासाठी मी आतुर
तो भलता कुणीच नव्हता
माझ्या मुलांना आणणारा
तो एक आयशर टेंपो होता..
तो एक आयशर टेंपो होता..

प्रशासक,मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *