ओलीचिंब झाली धरा
ऋतुचक्रा मुळे बघा
बदलते वातावरण सृष्टी
ढग आले नभात भरून
आणि आनंदते दृष्टी
नदी-नाले खळाळती
रानी पारवा घुमतो
ओलीचिंब झाली धरा
मनी गारवा फुलतो
बरसता मेघ पाहून
बळीराजा होतो आनंदी
सृष्टी सौंदर्याने नटते
धरती होते स्वानंदी
हिरवा गालिचा पसरतो
सर्वत्र हर्ष डुले
प्रसन्नचित्त करी धरा
दरवळ मातीचा झुले
ओलीचिंब झाली धरा
दवबिंदू तॄंणावर छान
मोत्यासम भासे जणू
विसरे सारे जण भान