अग्निपंख फाऊंडेशनच्या उमरखेड तालुका समन्वयकपदी अमोल पाईकराव

अग्निपंख फाऊंडेशनच्या उमरखेड तालुका समन्वयकपदी अमोल पाईकराव

यवतमाळ : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मुरली शाळेचे विषय शिक्षक अमोल पाईकराव यांची अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य डिजीटल उपक्रमाच्या तालुका समन्वयक पदी निवड करण्यात आली.

शिक्षक अध्यापन करत असताना अमोल पाईकराव यांनी अनेक उपक्रम, जयंत्या, स्मृतिदिन, प्रत्यक्ष कृतीद्वारे शिक्षण, सामान्य ज्ञान स्पर्धा,प्रश्नमंजुषा कार्यक्रम, कविता गायन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ व क्रीडा स्पर्धा असे अनेक उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यांच्या उत्कृष्ट कार्यापासून इतरांना प्रेरणा मिळेल त्याकरिता संधीच उपलब्ध होत नाही, अशा कार्याची प्रचिती होण्यासाठी आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याची संधी उपलब्ध होत आहे. आपण केलेले कार्य संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांपर्यंत पोहोचून वाचायला व शिकायला मिळेल. आपल्या शाळेत नवोउपक्रम युक्त शिक्षण देण्यास मदत होईल. “अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य”आपल्या हक्काचे व्यासपीठ असून आपल्या कार्याला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यास इतर शाळेतील शिक्षकांना प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने आपल्या शाळेत उत्कृष्टरित्या घेत असलेल्या कार्याचे फोटो,व्हिडिओ, यशोगाथा स्टडी फॉर्म होम, लेख, कविता अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र या ग्रुपवर तर कराव्यात असे अमोल पाईकराव यांनी कळविले. ◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *