असोसिएशन ऑफ स्माल एंड मीडियम न्यूज़पेपर ऑफ इंडिया जिला चंद्रपुर च्या वतिने पत्रकार दिन साजरा

असोसिएशन ऑफ स्माल एंड मीडियम न्यूज़पेपर ऑफ इंडिया जिला चंद्रपुर च्या वतिने पत्रकार दिन साजरा

चंद्रपुर : दिनांक 6 जानेवारी 2021 ला बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशासकीय भवन जिल्हा माहिती कार्यालय मीडिया सेंटर येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित मित्र व आदिवासी सेवक तशेच असोसिएशन ऑफ स्माल एंड मिडीयम न्युजपेपर ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष डी के आरिकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती सहाय्यक जाधव साहेेब यांची उपस्थििती होती. ते म्हणाले की, पत्ररकारांचा क्षेत्रात काम करताना सर्व बाबींचा विचार करून, सोशल मीडिया आणि आजची पत्ररकारिता याचे जतन करणे ही काळाची गरज आहे. जिल्हा माहिती कार्यालयातून जी
माहिती आवश्यक आहे. ती पुरवण्याचे काम सदैव या कार्यालयातून केल्या जाहिल. तसेच पत्रकारांचा अडचणी संदर्भात मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जोगड यांची उपस्थिती होती, जिल्हाध्यक्ष जोगड यांनी संघटना चे मागील 5 वर्षा पासून संघटने ने संपादक आणि मालक यांना वृतपत्र चाललाण्या करीता होत असलेली अड़चन यावर प्रस्ताविक प्रकाश टाकला, RNI E-एनुअल रिपार्ट फाइलिंग, महाराष्ट्र शासन जाहिरात धोरण, आणि लघु वृतपत्र ला महाविकास आघाडी चे एक वर्ष पूर्ति ची जाहिरात लघु वृतपत्र ला न देण्यात आली यावर पन प्रकाश टाकला. कार्यक्रमला दिनेश एकवनकर ,प्रभाकर आवारी, रोशन वाकडे, अरुण वासलवार, विनोद बोदेले, नरेश निकुरे, विठ्ठल आवळे , राजू बिट्टू लवार, मनोज पोतराजे, यांच्या उपस्थिती सह
संजय कन्नावार,यांच्या वाढदिवसही या ठिकाणी केक कापून साजरा करण्यात आला. त्यांना सर्वांंच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर आवारी यांनी केले तर प्रास्ताविक जितेंद्र जोगड व आभार दिनेश एकवनकर यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी संपादक, पत्रकार व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *