आम्ही भारताचे लोक
आम्ही भारताचे लोक
स्वातंत्र्याचा जयजयकार करतो
बंधुभाव, सर्वधर्मसमभाव
भावना हीच मनामध्ये गुंफतो
पंथ संप्रदाय धर्म
सारे एक होऊनी जाऊ
संस्कृतीचा वारसा
एक मुखाने गाऊ
आम्ही भारताचे लोक
सुख शांती चा आणू अधिवास
जाती-पाती विसरून सारी
तंत्रज्ञानाची धरु कास
संविधान स्वातंत्र्य समता
सामाजिक राजनैतिक न्याय देऊ
एकात्मतेचा झेंडा फडकवू
राष्ट्रप्रेमाचा अभिमान ठेवू
राज्यघटना लोकशाहीचा आत्मा
सण उत्सव समारंभाचा करू आदर
भारतातील निसर्गसौंदर्य जपू
प्रेमाच्या सलोख्याने राहू सादर