◼️ काव्य रंग : सारीपाट ✍️ मिलन डोरले/मोहिरे पुणे

सारीपाट

जीवनाचा आपल्या सारीपाट
निर्मात्याने असा मांडला
सोंगट्यारुपी आयुष्याचा
पसारा आपल्यावर सोपवला

कितीही आवरला तरी
संपत नाही पसारा
दिवसेंदिवस वाटतोय
गुंतागुंत वाढवणारा

सगळ्याच क्षेत्रात चालते
स्वार्थाचीच चढाई
येडे गबाळे मारतात
बिनबुडाची बढाई

तुम्ही आम्ही फक्त
मधल्या सोंगट्यागत शिपाई
वजीर नवाब आपला
खेळाचे सारे श्रेय घेई

आयुष्याचा सारीपाट
जो हुशारीने खेळेल
हमखास यशाची वाट
त्याच्या अंगणी मिळेल

मिलन डोरले/मोहिरे पुणे
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *