◼️ काव्य रंग : आयुष्य जगताना..! ✍️ अजितराजे थोरात. धाराशिव

🔶आयुष्य जगताना..!

शेवटाची वेळ आली जवळी मरण आले आहे.
आयुष्याला मात्र आता ग्रहण लागले आहे.

थांबेल आता एकदाचा प्रवास हा शेवटी,
मरणाआधीच स्मशानात माझे सरण रचले आहे

राहिला ना आजवर या जगी अमर कोणी,
तुझ्याही जगण्यातले अर्धे आयुष्य उरले आहे.

देवालाही प्रश्न पडला आता ठेवायचे कुठे मला,
पाप आणि पुण्याचे घडे सारखेच भरले आहे.

नव्हता विश्वास त्याचा गाभाऱ्यातील पाषाणावर,
पण का तरी शेवटी मग मी त्यालाच स्मरले आहे..!

◼️शब्दसाज अजितराजे थोरात.
    धाराशिव, मो नं 7620426330

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *