◼️ काव्यरंग : नवीन वर्षाचा कॉल….✍️सागर सुभाष मेश्राम मु. किन्हाळा, त. समुद्रपुर, जिल्हा – वर्धा

नवीन वर्षाचा कॉल….

तुझाच गुंतून होतो मी
सावरता आले नाही मला,
अनेकदा विचार आला पण
मन हे थांबवू शकले नाही मला…

कितेक दिवसाचा काळ लोटला
बघायचं तुजला नव्हत मला,
बघता तुजला चकित झालो मी
मिळाला नसेल नवीन कुठला…?

काय बोलावे कळेनासे झाले
क्षणभर स्तब्ध रहलो मी,
तुजला न बघण्याचा हट्ट हा माझा
पुरवायचा होता मला….

कळत नकळत कॉल केला
हट्ट हा माझा इथेच तुटला,
क्षणात पापण्या सागरच्या
भिजऊनी गेलीत आसवे…

तुला काय त्याच, पण
चेहरा तुझाही थोडा दुखावला,
दुखावलेल्या मनाला सावरत
कॉल कट केला…

नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुजला
अन् दुःख मात्र सागराला,
अथांग पसरलाय बिचारा
एवढे सारे दुःख झेलायला….

सागर सुभाष मेश्राम
मु. किन्हाळा, त. समुद्रपुर,
जिल्हा – वर्धा
8317299809

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *