◼️ काव्य रंग : सूर पापणीचे..स्वाती मराडे, पुणे

सूर पापणीचे

नको त्या आठवणी मी माझ्याशी ठरवले
कितीदा असे सांगूनही मनास कुठे पटले

विचारले मनास त्या आठवांनी काय मिळे
विसरून जावे आता होऊ दे तयास शिळे

मन आज माझे तरी माझ्याशीच भांडले
दिली साथ डोळ्यांनी सूर पापणीचे सांडले..

घातलेल्या बांधाला झटकून तिने लावले
भरून आलेले नभ गाली असे धावले..

टोचले शब्द काळजास लाट ती उचंबळे
सोडूनी किनारा झरू लागले पागोळे..

द्वंद्वात माझ्या आज आकाश सारे ढवळले
सूर पापणीचे सांडता ते जरासे निवळले..

©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *