◼️ काव्यरंग : मकर संक्रांती

मकर संक्रांती
[अष्टाक्षरी काव्यरचना]

आला आनंदाचा सण ।
नाव मकर संक्रांती ।।
नभा भिडण्याचे क्षण ।
स्वारी पतंगावरती ।१।

तिळ गुळ गोड गोड ।
घेरे प्रेमाने रे बोल ।।
आज अबोला तू सोड ।
बोल पुढे मधू बोल ।२।

खेळा पतंगाशी मौजे ।
स्पर्धा विमानाशी करा ।।
दक्ष वापरावे मांजे ।
पक्षी वाचवावे नरा ।३।

खावे मनसोक्त गोड ।
तुम्हा स्तव केले सारे ।।
द्यावं खुप घ्यावं थोडं ।
पोट सांगे सल्ला घ्यारे ।४।

नदी तळी स्नान नको ।
जीव शाबूत राहू दे ।।
धावू पतंगाशी नको ।
ऐक ‘कृगोनि’ जगू दे ।५।

!! सन्मा.सर्व वाचक बंधुभगिनींना चंद्रपूर सप्तरंग परिवारातर्फे मकर संक्रांतीच्या गोड गोड हार्दिक शुभेच्छा !!

– कविवर्य –
‘कृगोनि’ : श्री कृष्णकुमार निकोडे गुरुजी.

मु. पो. ता. जि. गडचिरोली., मधुभाष – ७७७५०४१०८६.
इमेल – nikodekrishnakumar@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *