◼️ काव्यरंग : मकरसंक्रात

मकरसंक्रात


वर्षभरात बारा राशीतून
सूर्याची होतात चार संक्रमण
मकर राशीतून होतो प्रारंभ
सूर्याचा उत्तरायण

मकरसंक्रात नवीन वर्षाचा
पौष मासे पहिलाच सण
कुठं पोंगल ,लोहडी कुठे बिहू
साजरा होई वेगवेगळ्या पद्धतीनं

मकरसंक्रात असे
स्त्रियांचा आवडता सण
सौभाग्यवती , नववधू
पाहती वाट आवर्जुन

सवासिनी वाटतात
हंगामी फळ पिकाचे वाण
लहानथोर करती धमाल
पतंग मजेत उडवून

दुःख असावे तिळाएवढे
सुख गुळासारखे असावे
वाटूनी मिश्रण तिळगुळाचे
स्नेहसबंध समृद्ध करावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *