◼️ काव्यरंग : संक्रांत….

संक्रांत….

तिळगूळ खावून गोड बोलणार्‍यांंना शुभेच्छा
तोंडावर गोड बोलणार्‍यांंना शुभेच्छा
पाठीमागे कडू बोलणार्‍यांंना शुभेच्छा
आपुलकीने गोड बोलणार्‍यांंना शुभेच्छा
काळीज जाळून बोलणार्‍यांंना शुभेच्छा
केवळ समाधानासाठी बोलणार्‍यांंना शुभेच्छा
तोंड वाकडे करून बोलणार्‍यांंना शुभेच्छा
जाणूनबुजून बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शुभेच्छा
जाणूनबुजून न बोलणार्‍यांंना पण शुभेच्छा!…
बोलणे शिकवणाऱ्या आईबाबांना शुभेच्छा
शिव्या देवून मित्रत्वाला जागणाऱ्यांना शुभेच्छा
अज्ञात, अदृश्य त्या नसल्या-असल्या शत्रूला शुभेच्छा
ह्रदयात कालवाकालव करणार्‍यांना शुभेच्छा
जातीधर्माचा जहर ओकणाऱ्या जिभेला शुभेच्छा 
फक्त पैशाची भाषा बोलणार्‍यांंना शुभेच्छा….
घालून पाळून बोलणार्‍यांंना शुभेच्छा
आणि ते मुकाट्याने सहन करणार्‍यांना शुभेच्छा! 
अबोल राहून खुप काही बोलणार्‍यांंना शुभेच्छा
डोळ्यांनी डोळयांशी बोलणार्‍यांंना शुभेच्छा
ओठांवर थांबलेल्या त्या भावनांना शुभेच्छा
रोज स्वप्नात येऊन बोलणार्‍यांंना शुभेच्छा!….
बहूढोंगी त्या राजकारण्यांना शुभेच्छा
दारूच्या बाटलीत देश बुडवणाऱ्यांना शुभेच्छा
धूर्त, बेशरम, कपटी आणि इमान विकणाऱ्या
त्या अधिकाऱ्यांना टेबलाखालून शुभेच्छा…
रात्रंदिवस डोळ्यात अंजन घालून
सीमेवर पहारा देणाऱ्या सैनिकांना शुभेच्छा…
पैसा आणि सत्तेच्या हव्यासापोटी
देशावर संक्रांत आणणाऱ्या त्या जोकरांना शुभेच्छा…
आणि ते बघ्याची भूमिका घेणाऱ्या
माझ्यासारख्या बिळातील उंदरांना शुभेच्छा….
शेवटी त्या निष्पाप ‘तीळगुळाला’ शुभेच्छा
त्याच्या भोवती अनेक भूमिकांमध्ये फिरत असलेल्या
इमानदार, दलबदलू मुंग्यांना ही खुप खुप शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *