◼️ काव्यरंग : आस..!

🔴आस..!

कधी कळली ना तुला
सखे भावना मनाची
आस लागली डोळ्यांना
फक्त एकदा पाहण्याची

आजवर केली फक्त
मी कल्पनाच तुझी
मनावर माझ्या
उमटली तुझी छबी

आवाज इतका गोड
जणू की कोकीळाच गाई
पडताच कानावरी
मन मंत्रमुग्ध होई

पाहिले मी तुजला
स्वप्नात कैकवेळा
प्रत्यक्षात आता
फक्त भेट एकवेळा

◼️शब्दसाज अजितराजे थोरात..!
मानमोडी धाराशिव
मो नं 7620426330

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *