परिस्थितीसापेक्ष प्रत्येकाने बदलणे काळाची गरज : अनंत निकम यांचे प्रतिपादन

परिस्थितीसापेक्ष प्रत्येकाने बदलणे काळाची गरज : अनंत निकम यांचे प्रतिपादन

सिलवासा: आज कोवीडसारख्या भीषण अशा महामारीतही आपण सर्वांनी एकमेकांना समजून घेत मात केली आहे. यापुढेही असेच प्रयत्न होत रहावे. जेणेकरून सामाजिक बांधिलकी जपता येईल. माणुसकीच्या नात्याची वीण अधिकाधिक घट्ट करण्यासाठी बदलत्या परिस्थितीत समाजातील प्रत्येकाने सक्षम होत असतांना परिस्थितीसापेक्ष बदलणे काळाची खरी गरज असल्याचे मत अनंत निकम यांनी मांडले. ते मराठा सेवा संघाच्या नवीन प्रदेश कार्यकारणी निवडीबाबत आयोजित समारंभात अध्यक्षस्थानाहून बोलत होते.

दिनांक १७ जानेवारी २०२१ रविवार रोजी ‘हाॕटेल विवा समरवणी’ सिलवासा, दादरा नगर हवेली येथे ‘मराठा सेवा संघाची’ बैठक श्री. अनंतराव निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मकरसंक्रांती, स्नेहमिलन, विविध विषयांवर चर्चा व प्रदेश कार्यकारणी निवडीनिमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती.

प्रत्येक समाजबांधवाने सक्षम होत असतांना ‘विद्या’ ‘उद्यम्’ व ‘विकास’ ही त्रिसूत्री अंगिकारावी तशी प्रामुख्याने गरज असल्याचे अनंत निकम म्हणाले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने कटीबध्द राहून शिवविचारांना आत्मसात केले पाहीजे. आत्मसात केलेल्या विचारांचा प्रसार व प्रचार समाजातील सर्व समाजापर्यंत पोहचवावा असे प्रतिपादन यावेळी निकम यांनी केले.

याप्रसंगी राजेंद्र वाघ, (राजनसाहेब), भाऊसाहेब डेरे, किशोर जाधव, संदीप पाटील, बिपीन पवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत ठाकरे यांनी केले तर आभार राजेंद्र वाघ यांनी मानले. सुरूची भोजनाची व्यवस्था अध्यक्ष अनंत निकम साहेबांनी केली होती.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *