◼️ काव्यरंग : संधीसाधू

संधीसाधू

बाजार भरला आहे
सर्वत्र संधीसाधूंचा अनेक
स्वार्थाशिवाय करत नाही
माणसं व्यवहार कित्येक

क्षणाक्षणाला होत आहे
लयलूट येथे प्रत्येकाची
गर्दी वाढलेली आहे
ठिकठिकाणी संधीसाधूंची

धडपड करून मानव
जमवितो पैसारुपी धन
मोहाला बळी पडून
अनेक होतात निर्धन

माणसांच्या भाऊगर्दीत
श्वास आज गुदमरतोय
संधी साधताच ओळखीचा
अचानक अनोळखी होतोय

संधीसाधूंच्या दुनियेत
आजही भली माणसे आहेत
पुण्याई मुळे त्यांच्याच
जगरहाटी चालू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *