हिरवळीचे सुख
ऋतुचक्रा मुळे बघा
बदलते वातावरण सृष्टी
सर्वत्र हिरवळ पसरते
आणि सजते दृष्टी
नेत्रदीपक हिरवळ पाहून
सृजनशीलता येते अंगी
सृष्टी सौंदर्याने नटते
हिरवळ गालीचाअसते संगी
सृष्टी नटते हिरवळीने
हर्षित होते मन तरंग
प्रफुल्लीत होते धरती
निसर्ग राजा रंगतो सप्तरंग
हिरवळीचे सुख मनाला
भावते नेत्रसुखद छान
पाखरे स्वच्छंदी फिरती
झाडे-वेली दिसती महान
हिरवळीवर चालल्याने
दृष्टी वाढते डोळ्यांची
वृक्षवल्ली सोयरे वनचरे
हिरवी काया अवनीची