गोड गुपित
गोड गुपित तुझे
आहे साठवून मनी
आठवण येता तुझी
जीव कासावीस तनी
तुला पाहता क्षणी
गेले मी स्वप्नात
रूप गोजिरे तुझे
साठविते मी मनात
गोड गुपित हदयी
अन धुंद झाले तन
तुझ्या प्रेमात दंग
हरपले माझे मन
गोड गुपित जीवनी
आशा पालवी नवी
नाती जपा या दोघांची
स्वप्ने मनी हवी
साथ तुझी बहरून यावी
मनी आनंद फुलतो
गोड गुपित जपून
स्वानंद अंगी डुलतो