✍️ भाकीत एक गुपित
कोण जाणतो उद्या
आपल्यासाठी कसा
म्हणून प्रत्येक क्षण
आनंदासंगे हसा !!
प्रत्येक क्षण कसा
आनंदात जाईल
यासाठीच झटाता
आशा पुरी होईल !!
स्वप्न पाहावी नित्य
सुखासमाधानाची
पुरी ती करणे आहे
कृपादृष्टी इशाची !!
आहे समस्तांसाठी
भाकीत एक गुपित
आपले भविष्य आहे
हाताचिया कु्पीत !!
✍️सौ.सत्यभामा आदिनाथ वाघमारे(झेंडे) म्हसवड नं २
कुकुडवाड ता माण जि सातारा
सदस्या मराठीचे शिलेदार समूह.