◼️ काव्यरंग : बदलते वारे

🔴बदलते वारे

मोठ्या कुटुंबात असे पूर्वी,
माणसांचा मोठा गोतावळा.
सणावाराला फुलायचा,
साऱ्या नातलगांचा मळा.

सख्खे चुलत असा कधी,
होत नसे दुजाभाव.
पुरण पोळी संगे सारे,
आमटीवरती मारती ताव.

दिवेलागणीला ओट्यावर भरे,
चिमुकल्यांची जत्रा सारी.
परवचा, रामरक्षेसोबत
आजीच्या गोष्टीची गंमत न्यारी.

एकविसाव्या शतकात मात्र,
वाहती बदलते वारे.
हम दो हमारा एक,
प्रत्येकाला एवढेच प्यारे.

आजी-आजोबा, काका- काकू
मायेची माणसं तुटले.
पैशांच्या मागे धावती सारे
कोवळे बालपणं कोमेजले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *