जिल्हात  24 तासात 51 कोरोनामुक्त ; 21 पॉझिटिव्ह

जिल्हात  24 तासात 51 कोरोनामुक्त ; 21 पॉझिटिव्ह

Ø  आतापर्यंत 22,292 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 217

चंद्रपूर, दि. 20 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 21 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 892 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 292 झाली आहे. सध्या 217 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 90 हजार 639 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 66 हजार 73 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

            जिल्ह्यात आतापर्यंत 383 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 347, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 13, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 21 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील सात, चंद्रपूर तालुका एक, बल्लारपुर एक, भद्रावती आठ, चिमुर एक, कोरपना दोन व इतर ठिकाणच्या एक रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *