◼️ काव्यरंग : नजरानजर ✍️ सदस्या मराठीचे शिलेदार समुह

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात घेण्यात आलेल्या ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेतील ‘नजरानजर‘ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना.

◼️नजरानजर

घडली अवचित ” भेट “
बरसत होता तो “मेघ”
“वळचणी”स त्या उभा मी
चमकली विजेची “रेघ” ।।१।।

समोर तू उभी दिसली
होतीस “चिंब ” भिजलेली
काळी कुरळी ओली बट
गो-या गाली रुळलेली ।।२।।

“हिरेजडित” मुकूट तो
जलबिंदूंचा गं “सजला”
स्वर्गाची अप्सरा भासली
न्हायलीस जशी “स जला” ।।३।।

सुमधुर गं हास्य ओठी
“चाफेकळी “शोभे नासिका
“टपोर” डोळ्यातला भाव
जणु कुणी “अभिसारीका” ।।४।।

गुलाबी ओठांच्या पाकळ्या
धुंदधुंद ती “मधुशाला”
तुझ्या रुपात गवसली
माझ्या स्वप्नीची” मधुबाला” ।।५।।

होताच नजरानजर
पाऊले गं “अडखळली”
नुरलो मी माझाच सखे
“प्रीत तुझ्यावरी जडली ” ।।६।।

सौ. भारती भाईक, नागपूर.
©सदस्या मराठीचे शिलेदार.
🕶️🌼🕶️🌼🕶️🌼🕶️🌼🕶️🌼🕶️🌼
नजरानजर
 
होताच नजरानजर
आली रक्तीमा गाली
थांब सखये जराशी
प्रेमाची चाहूल लागली
 
जादू अशी केली मजवरी
वाढली धडकन हृदयी
केलास इशारा जाता जाता
नेत्र तुझे सुंदर मृन्मयी
 
लक्षवेधक चाल  हरिणीसम
शोभती पैठणी भरजरी
माळूनीया मोगरा कुंतलात
घालितो पिंगा भ्रमरापरी
 
मन मोहीत झाले तुझवरी
सांग सखये भेटणार कधी
हृदयबंद भावनांना मजला
मिळणार सांग कधी संधी
 
श्रीकांत दीक्षित, पुणे.
©सदस्य मराठीचे शिलेदार समुह
 🕶️🌼🕶️🌼🕶️🌼🕶️🌼🕶️🌼🕶️🌼
नजरानजर

वळणावर एका अचानक
झाली नजरानजर
हृदयाची धकधक वाढली
मनाला घातला आवर…..१

झालो घायाळ मी
पाहून लावण्य व रूप
स्वप्नातली राणी माझ्या
होती अगदी अनुरूप…..२

नजर कटाक्षाने लागला
बाण माझ्या कोमल हृदयात
स्वप्ने रंगविली भविष्याची
मनातल्या मनात……..३

स्मितहास्याने तिच्या
परमानंद झाला मनोमनी
जीवनाचे सार्थक झाले
जणू या मानवजन्मी…..४

आरवण्याने कोंबड्याच्या
अचानक जाग आली
स्वप्नभंगाने माझी
धुळधाणच उडाली…..५

सौ अश्विनी सुहास मिश्रीकोटकर औरंगाबाद
©️सदस्या मराठीचे शिलेदार समूह
🕶️🌼🕶️🌼🕶️🌼🕶️🌼🕶️🌼🕶️🌼

मुख्य प्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *