एक जखम सुगंधी..!
दुःख विसरुनी सारे
पुन्हा हसावे वाटते
तुला पाहताच राणी
पुन्हा प्रेम करावे वाटत
आता मनानेच माझ्या
माझ्याशी वाद केला
रात्रभर सखे तुझ्या
फोटोशी संवाद केला
दुःख इतके काळजात की
मी आता दुःखाशी मैत्री केली
आकाशी मोकळे हिंडणारे पक्षीही
आता पिंजऱ्याला विसरून गेली
तू विसरून गेली असेल मला
पण शक्य नाही माझं तूला विसरणं
खूप अवघड असतं हो
काळजातील दुःख शब्दांत लिहणं
ठेवले जपून काळजात मी
दुःख मिळताच संधी
ते घाव काळजाचे
अन एक जखम सुगंधी..!
मो नं 7620426330