◼️ काव्यरंग : दिप जळुन- विजला

गझल: दिप जळुन- विजला

जे तुझ्यापाशी… ते नाही माझ्यापाशी !
जितं मध नाही… तिथं कशि मधमाशी !

नको तुझे ओठ…या माझ्या ओठापाशी
पोट भरलाय माझा… मि नाही उपाशी!

आता असु दे वेडे!… ते तुझे तुझ्यापाशी
अगं कुठे तुझि गंगा?… कुठे माझी काशी?

बरं गुन्हा मि केला… जिव लावण्याचा
आता कायद्याने द्या…तशी मला फाशी!

सखे!जसा हात दिला… तुझ्या तळ हाती
बघ तसा घात झाला… मज काळजाशी!

माझि चटणि- भाकर… चव देते जिभेला
यार तुझी पुरण- पोळी… तु खाँ नं तुपाशी!

दिप जळुन-विझला… या दवभरल्या राती
तुझी मिठी नको… ति आठवण उशाशी!

◼️युवा साहित्यिक
संदिप मेश्राम – प्रेमदिप
मु खरकाडा, जि गडचिरोली
मो नं 9421647203

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *