◼️आध्यात्मिक कविता : शोधू कुठे देवा तुला

शोधू कुठे देवा तुला

शोधु कुठे देवा तुला
तूच जगाचा निर्माता
संकटसमयी मदत करी
सर्व सृष्टीचा तारता

कोरो नाच्या महामारीत
लाक डॉउन मध्ये संकट ओढवले
लोक व प्रशासनाचे
हाल बेहाल फार झाले

शोधले आता देवा तुला
डॉक्टर नर्स आणि कामगारांमध्ये
सफाई कर्मचारी सह चालक
तसेच सर्वसामान्य लोकांमध्ये

या दुःखातून तूच
सावरून घेतले छान
शोधले तुला देवा आता
आशीर्वाद देतो तू महान

निर्गुण निर्विकार
तूच देतो मेवा
नेहमी कृपाछत्र ठेव
भक्तीत तुझ्या तल्लीन देवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *