पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा

 चंद्रपूर, दि. 21 जानेवारी : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा येथील दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दिनांक 22 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.45 वा. शासकीय विश्रामगृह ब्रम्हपुरी येथे नागपूरहून आगमन व राखीव. दु. 11 वा. नगरपरिषद ब्रम्हपुरीद्वारा आयोजित ब्रम्हपुरी शहरासाठी मंजूर झालेल्या 25 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती आवाराजवळ उपस्थिती. दु. 12 वा. ब्रम्हपुरी तालुक्यातील महिलांना रोजगार उपलब्ध होणाऱ्या गारमेंट क्लस्टर च्या उद्घाटन कार्यक्रमास बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हॉल येथे उपस्थिती. दुपारी 2.30 वा. ब्रम्हपुरी तालुक्यातील विकास कामाबाबत अधिकाऱ्यांची विश्रामगृह येथे आढावा बैठक. सायं. 4 वा. ब्रम्हपुरी वरून सिंदेवाही कडे प्रयाण. साय. 5.30 वा. शासकीय विश्रामगृह सिंदेवाही येथे आगमन व राखीव. सायं. 7 वा. सिंदेवाही येथून नागपूरकडे प्रयाण.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *