◼️ काव्य रंग : नभोवलय

नभोवलय

नभोवलय तुझे कायम
असते आनंदाने भरलेले
निखळ हस्य मनमोकळेपणा
कायम हृदयावर कोरलेले
स्कारात्मकतेच तेज तुझं
उजळून टाकतो परिसर
सहवासातील प्रत्येकजण
मोहित होतो क्षणात तुझ्यावर
दंतपंक्ती जणू शुभ्र मोती
शोभून दिसे शामल रंगावरती
बोलण्यातील लडिवाळ पणा
भुरळ घालतो माझ्या मना
चेहऱ्यावरचा निरागस भाव
माझ्याही मनाचा घेतो ठाव
नाहीस तू सौंदर्याची खान
माझ्यासाठी मात्र प्रेरणास्थान
अदभुत चैतन्याचा तो झरा
वाहतो तुझ्या अंतरंगात
अशीच लाभावी साथ तुझी
फरक न पडावा स्वभावात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *