रेल्वेरुळावर झोकून इसमाची आत्महत्या ; शरीराचे झाले दोन तुकडे

रेल्वेरुळावर झोकून इसमाची आत्महत्या ; शरीराचे झाले दोन तुकडे

आर्थिक व मानसिक तणावात असल्याने केली असावी आत्महत्या, मित्र परिवारात चर्चा

ब्रम्हपुरी :  येथील रेल्वे स्टेशन पासून १०० मीटर अंतरावर एक इसमाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले मृतक इसम ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशपुर येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते प्राप्त माहिती नुसार मृतक इसमाचे नाव विलास हरिदास दहीवले वय (४०) वर्ष, शिवम अपार्टमेंट, गणवीर रुग्णालयाजवळ ब्रम्हपुरी असे नाव आहे. सदर शिक्षक हे आर्थिक व मानसिक रित्या तणावामध्ये असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असे बोलण्यात येत आहे. आत्महत्या ग्रस्त शिक्षकाने रात्री ११ते१२ च्या दरम्यान आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे , सदर शिक्षकाच्या शरीराचे मध्या पासून दोन तुकडे झाले सदर घटनेची माहिती कळताच रात्रौ २ ते २.३० चे दरम्यान ब्रम्हपुरी पोलीसानी घटनास्थळी भेट दिली परंतु सदर घटना रेल्वे पोलिसांच्या हद्दीत असल्याने सदर प्रेत तिथेच होते , सकाळी रेल्वे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला, मृतक व्यक्तीच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. मृतक व्यक्तीच्या परिवारावर शोककळा पसरली असून पूर्ण परिवार दुःखात बुडाला आहे. पुढील तपास रेल्वे पुलिस अधिकारी करीत आहेत.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *