24 तासात 39 कोरोनामुक्त ; 23 पॉझिटिव्ह

 24 तासात 39 कोरोनामुक्त ; 23 पॉझिटिव्ह

Ø  आतापर्यंत 22,353 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 192

चंद्रपूर, दि. 22 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 23 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 928 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 353 झाली आहे. सध्या 192 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 92 हजार 495 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 67 हजार 182 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 383 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 347, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 13, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 23 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 14, चंद्रपूर तालुक्यात एक, बल्लारपूर एक, भद्रावती दोन, चिमुर एक, वरोरा दोन व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *