◼️ काव्यरंग : का घाव हा काळजाला

💕 का घाव हा काळजाला

सर्व काही उमजून उगाच
नवनाटकी कशाला
काळजाला भेदनाऱ्या
ओल्या जखमा कशाला

दिखाऊ पणाच प्रेम
मांडल कशाला
प्रेमामृतांनी मनी भरलेला
भावनांचा रस सांडल कशाला

निर्दयी मनाने घाव घालून
घायाळ केलं कशाला
नयानातून ओघळणाऱ्या
खाऱ्या आसवा आता कशाला

एक वाट सोडून
अनेक वाटा त्या कशाला
कोरड्या या मनाला
उगाच सांत्वन आता कशाला ..

प्रीतिसाठी ह्या उरामधे
पेट घेणारा वानवा कशाला
ओल्या पावसामध्ये
आता तुझा गारवा कशाला….

तुझ्या नावाचा हा कंप
कानावराती आघात कशाला
भावनांशी खेळणारी तुझी
सत्वपरीक्षा कशाला…..

स्वप्न रंगवणारी ती
कावड कशाला
विस्कटलेल्या मनाची
आता सावड कशाला

नको तर सांग ना
उगाच मनी त्रास कशाला
बोलता बोलता
असा दुरावा कशाला

खऱ्या प्रेमा मध्ये उगाच
भातुकलीचा खेळ कशाला
आशेवर जिवंत ठेवणारा
तुझा उल्हास आता कशाला

पुन्हा त्या आठवणींचा
जागर कशाला
प्रेमाच्या वाटेवर भावनांचा
बाजार कशाला ……
काळजाला भेदनाऱ्या
ओल्या जखमा कशाला ……….

◼️कवी : शब्दांकुर, उल्हास कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *