◼️ काव्यरंग : चांदणे प्रितीचे…

💕 चांदणे प्रितीचे…

अबोल हा चंद्र तुझा – अता मावळू दे
अंतरी पौर्णिमेच्या – काय ते कळू दे….

जीवनात मी दिवा – तू ज्योत माझी
मलाही तुझ्यासवे – मंद मंद जळू दे…

अस्तित्व तुझ्यातच – माझे विलीन आहे
गंध श्वासात माझ्या – तुझा दरवळू दे…

मागणे प्रिये तुला – हे एवढेच माझे
वारा बनून मज – केसात सळसळू दे…

असंख्य पाहणार तू – चांदणे प्रितीचे
जरा पावसास – डोळ्यातूनी टळू दे…

सखे वाचतो अक्षरे – तुझ्या आठवांचे
वहीतल्या गुलाबाला – एकदा कळू दे…

आलिंगनात अता – स्वप्नांचा खजिना
भार विरहाचा कोसळता कोसळू दे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *