◼️काव्यरंग : आत्मियता

🔴 आत्मियता

आईह्रदयीची आत्मियता
आपुलकीचा अजोड नमुना
त्रिभुवनी पुजनिय जननी
वात्सल्याचा झरतो पान्हा

झेलून दुःख अमाप जीवनी
देते लेकरा सुखाची सावली
समर्पण अन् त्यागाची मूर्ती
निस्वार्थ सेवा करी माऊली

अपत्य जीवनी येता दुःख
कळ मातृह्रदयात उठे
सुखी ठेवण्या “मम लेकरा”
आर्त हाक ती ईश्वराकडे

स्वप्न नयनी सदा पाही
उत्कर्ष होण्या लेकराचा
कष्टासह सदिच्छा आत्मिक
हर्ष तिला यशप्राप्तीचा

चंंदनापरी झिजणे सतत
आत्मियतेची नदी वाही
कर्तव्यनिष्ठा मुलांप्रतीची
उजळे उज्वल दिशा दाही

सद्गुणांची रूजवण मुलांत
करणे मानी जीवन वैभव
पथदर्शक ती दिपस्तंभासम
सन्मार्गी पार होण्या भव

ह्रदयाच्या प्रत्येक स्पंदनातून
शुभाशिर्वादाचा निघे श्वास
आत्मियता ही ममत्वाची
असे रेशमी नात्याचा विश्वास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *