👣👣पाऊलवाटा.. 👣👣
किती तुडवला पाऊलवाटा..
वादळात आणि उन्हा,पावसा
तरीही तुझ्या पाऊलखुणा
आजूनही मनी आठवतात …१
जन्मांतरीचे आपुले नाते
आहे अजूनही तसेच जुने
शतजन्मांतरही ते राहील
तसेच स्मरणात आठवणीने ..२
वादळे येतील आणि जातील
पाऊलवाटा कधी बुजनार नाहीत
आठवणींचे पक्षी त्या प्रवाहात
राहणार सततच वाहत ….३
चला प्रकाशाच्या पाऊलवाटा
पुन्हा शोधुया मानवी जीवनात
मनाच्या पंखाने तुडवित वाटा
आकाशाला गवसणी घालीत.
कती तुडवल्या पाऊलवाटा ..४