💁♂️ राष्ट्रीय बालिका दिवस का साजरा करतात?
💕 Today’s| Special
आज (24 जानेवारी) राष्ट्रीय बालिका दिवस. याच दिवशी इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो.
आज मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये यशाची पावले टाकत पुढे जात आहेत. मग शिक्षण, कला, क्रीडा, राजकारण, उद्योजक आणि आता देशाच्या संरक्षण क्षेत्रातही आपले पाऊल टाकत सर्व क्षेत्रात भक्कम कार्य करताना दिसत आहेत.
मात्र, आजही समाजामध्ये मुली विविध क्षेत्रात पुढे जात असताना अनेक समस्यांना बळी पडताना दिसतात. उदारणार्थ सांगायचे झाले तर समाजामध्ये मुलगा-मुलगी असा भेदभाव केला जातो. त्यामुळे मुलींना शिक्षण घेताना अडचणींचा सामना करावा लागतो.
राष्ट्रीय बालिका दिवस हा साजरा करण्यामागचा हेतू हाच आहे की, मुलींच्या हक्कांविषयी जनजागृती व्हावी, मुलींना शिक्षण घेताना अडचणी येऊ नये, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर आजच्या दिवशी स्त्री शक्तीचे रूप म्हणून इंदिरा गांधी यांची आठवणही काढली जाते.
🔷✍️ राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्याचे उद्देश
◼️ मुलींच्या हक्कांविषयी जनजागृती करणे.
◼️ मुलींच्या शिक्षणाविषयी जनजागृती करणे.
◼️ समाजातील असमानतेबद्दल जनजागृती करणे.
◼️ मुलींना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी.
◼️ मुलींना त्यांचे हक्क मिळतील याची खात्री करून देण्यासाठी.