🔷 काव्यरंग : धन्यवाद

🔷 धन्यवाद….🙏

मला मिळालेले ते कुठे आशिर्वाद होते
आयुष्य माझे माझ्याचसाठी वाद होते….

ऐकले माझ्या तेरवीत माझेच गोडवे मी
सरणावरही मला फक्त तुझेच नाद होते….

गुलाबी पाकळ्यांना, रक्त लागला कधी ?
अरे, फक्त निरपराध काटे बरबाद होते….

माझ्या अनाथ अश्रूंना भेटली न जागा
सारेच आपुलकीचे देखणे फसाद होते….

उपकारात या जिंदगीचा पराजय झाला
तरी ‘हसणे दिखाऊ ‘ माझे नाबाद होते….

पाठीमागचे सत्कार मी ओळखून होते
अन् त्याच नात्यांना माझे धन्यवाद होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *