◼️ काव्यरंग : तिरंगा !

🔶 तिरंगा !

केशरी रंग असे शौर्याचा
पांढरा शांततेचे प्रतिक,
अन् हिरवाही समृद्धीचा
भासे गौरवशालीअधिक!

चोवीस तासच दिवसाचे,
दर्शवी, अशोक चक्र निळे,
संदेश, सातत्य, प्रगतीचा,
मधोमध नजरच खिळे!

ध्वज, भारतभूस लाभला,
ठेवतो, सारेच त्याचा मान,
प्राणाहूनही प्रिय आम्हाला
“तिरंगा आमचा अभिमान”!

तीनास दोन प्रमाणातच
तयार होई कर्नाटकात,
खादी, सुती, रेशीम, लोकर,
वापरून नऊच मापात!

स्वातंत्र्य, प्रजासत्ताक दिनी,
फडकतो लाल किल्ल्यावर,
ध्वज संचलन सोहळ्याने
दिमाखात पडतसे भर!

शौर्य पदकांनी सन्मानिती,
होती पदक, चक्र बहाल,
विविधतेतून, ऐक्य दिसे,
आमच्या तिरंग्याची कमाल!

सौ. प्रिया प्रकाश गावडे,
ठाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *