◼️ काव्यरंग : प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन

सव्वीस जानेवारीस असे
आमचे प्रजासत्ताक दिन
सार्वोभौमत्वाचे ते प्रतीक
असे आमचे राष्ट्रीय सण

स्वतंत्र्य भारतास नव्हते
आपले स्वतःचे संविधान
१९३५ च्या कायद्यानुसार
चालत असे राज्यशासन

संविधान तयार करण्या
मसुदा समिती ती स्थापन
१६५ दिवसाच्या चर्चेअंती
दिली मंजुरी सभागृहान

सव्वीस जानेवारी पन्नास
अंमलात आले संविधान
प्रजासत्ताक दिन साजरा
त्या आठवणींच्या निमित्तानं

देशभर या दिवशी होते
राष्ट्रध्वजाचे त्या आरोहण
मानवंदना देऊनी त्यास
साजरा होतो सुवर्ण दिन

8275397645

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *