जनतेच्‍या आशा आकांक्षांचे विकासात रुपांतर करण्‍यासाठी डिजी बिजेपी या अॅपची निर्मिती – आ. सुधीर मुनगंटीवार

जनतेच्‍या आशा आकांक्षांचे विकासात रुपांतर करण्‍यासाठी डिजी बिजेपी या अॅपची निर्मिती – आ. सुधीर मुनगंटीवार

◼️डिजी बिजेपी या अॅपचा शुभारंभ सोहळा संपन्‍न

◼️पहिल्‍या मतदार सौ. आशा विकास अलोणे यांच्‍या हस्‍ते शुभारंभ

◼️भटाळी गावातील व्‍यायाम शाळेचे उद्घाटन

चंद्रपूर : जनतेच्या आशा आकांक्षांचे विकासात रुपांतर करणे हे डिजी बिजेपी या अॅपच्‍या निर्मिती मागील मुळ उद्देश आहे. म्‍हणूनच या अॅपचे उद्घाटन भाग क्रमांक १, मतदार यादी क्रमांक १ मधील मतदार क्रमांक १ सौ. आशा विकास अलोणे यांच्‍या हस्‍ते होणे विशेष औचित्‍यपुर्ण असल्‍याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दि. २५ जानेवारी रोजी राष्‍ट्रीय मतदार दिवसाचे औचित्‍य साधुन चंद्रपूर तालुक्‍यातील भटाळी या गावात आयोजित डिजी बिजेपी या अॅपच्‍या शुभारंभ सोहळयात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर अकोल्‍याचे भागवताचार्य गजेंद्र चैतन्‍य महाराज, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, माजी भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष हरिश शर्मा, भाजपा नेते रामपाल सिंह, भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्‍हा परिषद सदस्‍या रोशनी खान, वनिता आसुटकर, माजी जिल्‍हा परिषद सदस्‍य विलास टेंभुर्णे, नामदेव डाहुले, गौतम निमगडे, सुभाष गौरकर, पंचायत समितीचे सभापती केमा रायपुरे, सौ. आशा विकास अलोणे, माजी महापौर सौ. अंजली घोटेकर, ब्रिजभुषण पाझारे, राकेश गौरकार, प्रज्‍वलंत कडू, सुरज पेदुलवार, यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, या देशात कशाचीही कमतरता नव्‍हती मात्र एकजुट होवुन, एक लक्ष्‍य ठेवुन काम करण्‍याच्‍या अभावामुळे आपण देशाच्‍या प्रगतीमध्‍ये कमी पडत आहोत. राज्‍याची लोकसंख्‍या साडेबारा कोटी आहे, राज्‍यात साडे चौदा कोटी मोबाईल आहेत. त्‍यातील आठ कोटी स्‍मार्ट फोन आहेत. मात्र ज्‍याच्‍या हाती स्‍मार्ट फोन आहे तो स्‍मार्ट होण्‍याच्‍या दृष्‍टीने कमी पडतोय. ही परिस्थिती बदलावी म्‍हणून आम्‍ही डिजी बिजेपी हे अॅप सुरु केले आहे. शेकडो लोक आपल्‍या समस्‍या विषयक निवेदने घेवुन माझ्या कार्यालयात येतात. त्‍यात त्‍यांचा वेळ जातो. मात्र हीच निवेदने ते अॅपच्‍या माध्‍यमातुन देवु शकतात. या अॅपवर अधिका-यांचे नंबर्स उपलब्‍ध आहेत. या पुढील काळात हे अॅप अधिकाधिक विकसीत करुन त्‍या माध्‍यमातुन तरुणांना रोजगाराच्‍या संधी, शासकीय योजनांची माहीती देण्‍याच्‍या दृष्‍टीने सुविधा उपलब्‍ध करण्‍यात येणार आहेत. भविष्‍याचा वेध घ्‍यायचा असेल तर परिपुर्णता आवश्‍यक असल्‍याचे यावेळी बोलताना म्‍हणाले.
मतदार दिनानिमित्‍त यावर्षीची संकल्‍पना सर्व मतदार सशक्‍त, सतर्क आणि सुरक्षीत तथा जागरुक असावे अशी आहे. आज आपण अकरावा राष्‍ट्रीय मतदार दिवस देशभरात साजरा करत असल्‍याचे सांगत आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, शहीदांनी, हुतात्‍म्‍यांनी आपल्‍या प्राणांचे बलिदान देत लोकशाहीचा मंगल कलश आपल्‍याला दिला मात्र आपल्‍याला कर्तव्‍याची जाणीव उरलेली नाही. लोकशाही सुदृढ व बळकट व्‍हावी यादृष्‍टीने मतदान करणे अत्‍यंत गरजेचे आहे. आपण मतदार नोंदणीला जात नाही. लोकप्रतिनिधी कसा असावा यावर आपण भरभरुन भाष्‍य करतो मात्र मतदान करताना अनुत्‍सुक असतो. या देशाच्‍या सर्वांगीण प्रगतीसाठी, देशाचा मान वाढविण्‍यासाठी अभिमानाने मतदान करण्‍याची आवश्‍यकता आहे. कारण आपण नागरिक या लोकशाहीचे राजे आहोत. लोकशाहीची मुल्‍ये अधिक बळकट करण्‍याची जवाबदारी आपल्‍यावर आहे. असेही आ. मुनगंटीवार बोलताना म्‍हणाले.
यावेळी देवराव भोंगळे, सुभाष गौरकार यांचीही भाषणे झालीत. डिजी बिजेपी या अॅपचे लोकार्पण बल्‍लारपुर विधानसभा क्षेत्राच्‍या मतदार यादीतील पहिल्‍या मतदार सौ. आशा विकास अलोणे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी भेट वस्‍तु देत त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी श्री. भुषण देशपांडे यांनी अॅपचे सादरीकरण केले. अॅपबाबत विस्‍तृत माहीती त्‍यांनी यावेळी दिली. श्री. भुषण देशपांडे व त्‍यांचे सहकारी अक्षय सोनवणे, अनिरुध्‍द भालेराव, प्रज्‍वलंत कडू, सुरज पेदुलवार यांचाही सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे संचालन श्री. नासिर खान यांनी केले.
यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्‍य राकेश गौरकार, आशा अलोणे, विकास पेंदाम, वैशाली सोनटक्‍के, नदिम रायपुरे, शारदा मेश्राम यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
यावेळी भटाळी गावातील व्‍यायाम शाळेचे उद्घाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. आ. मुनगंटीवार गावात प्रवेशताना दिंडी व भजन यांच्‍या माध्‍यमातुन त्‍यांचे जोरदार स्‍वागत करण्‍यात आले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *