◼️ काव्यरंग : गंमत जमत शाळेतली

गंमत जमत शाळेतली

गंमत जमत शाळेतली
आठवते मला आज
गुरुजींच्या शिकवणीची
फेडू कशी व्याज

एका दोनाचे फाडे
नी गणिताची भाषा
कितीही शिकविले गुरुजी तरी
मात्र पदरी येई निराशा

मराठी – गिराठी, इंग्लिश जरी
डोक्यामध्ये गेली
पेपर सोडविता – सोडविता
सांज कधी झाली?

इतिहासातील शिवाजी
आठवितो कधी – कधी
विज्ञानाची गोष्ट केली तर
होते गा फजिती

इतके मात्र शिकून
भूगोल मले जमला
चंद्र कुठे आहे विचारले तर
तो आकाशात दिसला

शाळेतले ते दिवस
विसरणार ना कधी
आजही मी शाळेत
डोकवितो अधि – मधी…!

मो.9373675398

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *