पोंभुर्णा येथील सा.बां. उपविभागीय कार्यालय शहर व तालुक्‍याच्‍या विकासाचा केंद्रबिंदु ठरावा – आ. सुधीर मुनगंटीवार

पोंभुर्णा येथील सा.बां. उपविभागीय कार्यालय शहर व तालुक्‍याच्‍या विकासाचा केंद्रबिंदु ठरावा – आ. सुधीर मुनगंटीवार

सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन संपन्‍न

पोंभुर्णा : शहरात व तालुक्‍यात आम्‍ही विकासाची दिर्घ मालिका तयार केली. अनेक विकासकामे या शहरात व तालुक्‍यात प्रगती पथावर आहेत. या विकासकामांचे कार्यान्‍वयन उत्‍तम पध्‍दतीने व्‍हावे यासाठी पोंभुर्णा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता स्‍तराचे कार्यालय उपलब्‍ध व्‍हावे यासाठी आम्‍ही प्रयत्‍न केला. २०१८ मध्‍ये यासाठी आम्‍ही मान्‍यता दिली. आज या कार्यालयाचे लोकार्पण करताना मला मनापासुन आनंद होत आहे. हे कार्यालय पोंभुर्णा शहर व तालुक्‍याच्‍या विकासाचा केंद्र बिंदु ठरावा अशी अपेक्षा माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली.

दि. २७ जानेवारी रोजी पोंभुर्णा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता श्री. अनंत भास्‍करवार, उपविभागीय अभियंता श्री. टांगले, गजानन गोरंटीवार, विनोद देशमुख, अजित मंगळगीरीवार, ईश्‍वर नैताम, चरण गुरनुले, नहलेश चिंचोलकर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा शहर व तालुक्‍यात मोठया प्रमाणावर विकासकामे पुर्णत्‍वास आली असुन काही विकासकामे प्रगती पथावर आहेत. प्रामुख्‍याने ग्रामीण रुग्‍णालयाचे बांधकाम, नगर पंचायत इमारतीचे बांधकाम, टुथपिक उत्‍पादन केंद्र, अगरबत्‍ती उत्‍पादन केंद्र, बांबु हॅन्‍डीक्रॉफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट, महिलांना रोजगार देण्‍याच्‍या दृष्‍टीने कार्पेट तयार करण्‍याचे केंद्र यासह शहरातील मुख्‍य रस्‍त्‍यांचे सिमेंटीकरण, दुभाजक व पथदिवे बसविणे, पंचायत समितीच्‍या नविन इमारतीचे बांधकाम, आकर्षक वनविश्रामगृह, भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी स्‍मृती इको पार्क, स्‍टेडियमचे बांधकाम, पोंभुर्णा शहरात महात्‍मा ज्‍योतीबा फुले सभागृहाचे बांधकाम, संताजी जगनाडे महाराज सभागृहाचे बांधकाम, पत्रकार भवनाचे बांधकाम पुर्णत्‍वास आले असुन बसस्‍थानकाचे बांधकाम मंजुर करण्‍यात आले आहे. ७ कोटी रु. किंमतीची पाणी पुरवठा योजना, भूमीगत नाली बांधकाम, चौक सौंदर्यीकरण, आधूनिक व्‍यायाम शाळा, आयटीआयचे नूतनीकरण, तलाव सौंदर्यीकरण आदी कामे मंजुर करण्‍यात आली असुन काही कामे प्रगतीपथावर आहेत. डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय जनतेच्‍या सेवेत रुजु झाले. आदिवासी मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहाचे बांधकाम मंजुर करण्‍यात आले. शहरात आरो मशीन द्वारे शुध्‍द पिण्‍याच्‍या पाणी पुरवठा करण्‍यात येत आहे. पाणी स्‍वच्‍छता पार्कचे बांधकाम करण्‍यात आले आहे. आकर्षक व अत्‍याधुनिक अशा आठवडी बाजाराचे बांधकाम पुर्णत्‍वास आले आहे. या परिसरातील सांस्‍कृतीक चळवळीला वेग देण्‍यासाठी खुल्‍या नाटयगृहाचे बांधकाम सुध्‍दा होवु घातले आहे. यासोबतच पोंभुर्णा तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागात रस्‍ते व पुलांची बांधकामे मोठया प्रमाणावर पुर्णत्‍वास आली आहे. सदर विकासकामांच्‍या प्रभावी कार्यान्‍वयनासाठी पोंभुर्णा येथे २०१८ मध्‍ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या उपविभागीय कार्यालयाला आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रीपदाच्‍या कार्यकाळात मंजुरी दिली होती. आज या उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन संपन्‍न झाले.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *