◼️ काव्यरंग : लढणे तू सोडू नको

लढणे तू सोडू नको

थांबू नको रडू नको, विचार करत बसू नको
अपयशाच्या दबावात, लढणे तू सोडू नको

वाट जरी संघर्षाची
अंथरलेल्या काट्यांची
वेदनांच्या विचाराने
घाबरून असा जाऊ नको
अपयशाच्या दबावात, लढणे तू सोडू नको

ध्येयासाठी अनेक प्रयास
साक्ष देतो आपला इतिहास
एक-दोन अशा प्रयत्नांनी
खचून कदापि जाऊ नको
अपयशाच्या दबावात, लढणे तू सोडू नको

सोडला जरी जगाने हात
तूच कर तुझ्यावर मात
टीकास्त्रांच्या आक्रमणाची
चिंता मात्र करू नको
अपयशाच्या दबावात, लढणे तू सोडू नको

तो दिवस नक्की येईल,
मेहनत तुला फळ देईल
शुभेच्छांचा पाऊस पाहून
चकित मुळीच होऊ नको
अपयशाच्या दबावात, लढणे तू सोडू नको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *