व्यथा सांगतो शेतकऱ्याची
व्यथा सांगतो शेतकऱ्याची
कान देऊन ऐका
बैल, घोडा, गाढव
आम्हां मुर्ख समजू नका
उन्हात राबून, पावसात भिजून
पिकवितो गहू
यापुढे अन्याय केला तर
तुम्हां पुरात वाहून देऊ
गोर – गरीबांच्या कष्टाला
योग्य हमी द्या
नाहीतर एक दिवस येईल असा
म्हणालं डब्बल पैक घ्या
सावकार, पाटील, सरकार तुमचे
बेघर होतो आम्ही
असेच चालत राहिले तर
भुके रहाल तुम्ही
धान झाले, कापूस झाला
झाला पिकवून कांदा
शोषण शेतकऱ्याचे पुरे झाले
आता सोडा हा धंदा
आम्हां शेतकऱ्यांना तुम्ही
समजू नका पांडू
आता अन्याय सोडा; भाव द्या
नाहीतर कमरेत घालू दांडू…!
मो. 9373675398