◼️ काव्यरंग : सुंदर निसर्गसृष्टी ✍️सौ.भारती सावंत, मुंबई

सुंदर निसर्गसृष्टी

चला सयांनो घेऊया
आनंद या जीवनाचा
क्षणभंगुर हे आयुष्य
ना थांगपत्ता मनाचा

बनवली देवाजीने ही
सुंदरच ही निसर्गसृष्टी
धुंद नभी चंद्र चांदणे
झेलू पर्जन्याची वृष्टी

रविच्या सहस्त्ररश्मी
उधळितो रंग नभात
पाखरांची किलबिल
होतसे प्रसन्न प्रभात

दिसे पहाटेला सुंदर
नजारा सृष्टीचा रम्य
फुलले शिवार हिरवे
त्यात जीवनाचे गम्य

बागडती हरिणे ससे
स्वच्छंद चरते रानात
नानाविध रंगीत पक्षी
किलबिलती पानात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *