प्रेमसंबंधातून प्रेयसी झाली गर्भवती, प्रियकराकडे लावला लग्नाचा तगादा

प्रेमसंबंधातून प्रेयसी झाली गर्भवती, प्रियकराकडे लावला लग्नाचा तगादा

प्रियकराने पीडित मुलीला निर्जंनस्थळी नेत केली मारहाण

चंद्रपूर – 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला तुकूम परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय मुलीला वेकोली परिसरातील निर्जन ठिकाणी एका युवकाने व त्याच्या मित्राने जबर मारहाण करीत त्या ठिकाणी सोडून फरार झाले.
सदर मुलगी गंभीरपणे जखमी झाली असल्याने तिला सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. 29 जानेवारीला पीडित मुलगी शुद्धीवर येताच दुर्गापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी पीडितेचे बयान घेत घटनेची माहिती घेतली.
पीडितेला मारहाण करणारा 19 वर्षीय गौरव उर्फ आशिष पिंपळकर व त्याचा मित्र अखिलेश जाधव यांच नाव समोर आलं.
आरोपी गौरव हा पीडितेचा प्रियकर असल्याचे निष्पन्न झाले असता ठाणेदार धुळे यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करीत गौरव पिंपळकर व अखिलेश जाधव या दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली.
पीडित मुलगी ही अडीच महिन्याची गर्भवती आहे, ही बाब तिने प्रियकर गौरव ला सांगितली व लग्न करण्यास सांगितले मात्र गौरवने रागाच्या भरात पीडित मुलीला निर्जंनस्थळी नेत मारहाण केली.
दुर्गापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीना तात्काळ अटक करून त्यांचेवर 376, 324, 326 व कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक बावनकर करीत आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *