पुन्हा वाजली शाळेची घंटा
पुन्हा वाजली शाळेची घंटा
पाटी पुस्तक वही घेऊ या छान
दहा महिन्यानंतर उघडली शाळा
ऑनलाइन शिक्षणाचा गेला ताण
तासिका होतात शाळेत चार
अकरा ते दोन चा असतो वेळ
मास्क सॅनिटायझर आवश्यक
बाल बालिकांचा सुसंगत मेळ
ऑनलाइन शिक्षणाचे दुष्परिणाम
कोरोनाचे सावट झाले कमी
पुन्हा वाजली बघा शाळेची घंटा
पालक ही आपल्या कामात रमी
तापमान पल्स मोजतात शाळेत
मुख्य विषयाला दिला आहे भार
सोशल डिस्टन्स ठेऊन शिकताना
अभ्यासक्रम पूर्ण करायचा फार
मित्रासंगे अभ्यास करण्यात
शाळेत वाटते फार गोडी
गमती जमती करताना
गणितातल्या सोडवाव्या कोडी
◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️